Breaking News

ग्रामीण भागातील एस टी बस सुरू करावी - नगरसेवक सचिन सूर्यवंशी (बेडके)

 

            फलटण दि 22 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोरोनामुळे एसटी बसची सेवा बंद होत्या. पण सध्या प्रवाशांच्या प्रवासाची अडचण सोडवण्यासाठी केवळ शहरी भागातीलच प्रमुख रस्त्यावर एसटी बसची सेवा सुरू करून चालणार नाही. तर ग्रामीण भागातील सर्व तालुका अंतर्गत प्रमुख रस्त्यावर किमान एक तरी एस टी बसेसच्या फे-या सुरू कराव्यात म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना सन उत्सव काळात  अडचणी कमी होतील, अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन सुभाष सूर्यवंशी (बेडके) यांनी निवेदन देऊन केली आहे. 

        नगरसेवक सचिन सुभाष सूर्यवंशी (बेडके) यांनी परिवहन मंत्री अनिल परब तसेच फलटण एसटी डेपो मॅनेजर कुंभार साहेब यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,  एसटी डेपो मार्फत महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार आपल्या एसटी डेपो मार्फत प्रमुख रोडवर एसटी बसेस सरू केल्याबददल ना.श्री. अनिल परब साहेब परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे तसेच महाआघाडी सरकारचे सर्व मा .मंत्री महोदयांचे व सर्व शासकीय अधिकारी यांचे प्रदासी जनता व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. 

        सध्या महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण व डोंगरी भागातील ज्येष्ठ नागरीक प्रवासी शालेय मुली, मुले,महिला यांना गणेश उत्सवात प्रवाश्याना प्रवास करणे कठीण होणार आहे .कोरोनामुळे एसटी बसची सेवा बंद होती. पण सध्या प्रवाशांची प्रवासाची अडचण सोडवण्यासाठी केवळ शहरी भागातीलच प्रमुख रस्त्यावर एसटी बसची सेवा सुरू करून चालणार नाही. तर ग्रामीण व डोंगरी भागातील सर्वच तालुका अंतर्गत सस्त्यावर आज पासूनच किमाण एक तरी एसटी बसची फेरी सुरू करणे गरजेचे आहे.

        नविन शैक्षणिक वर्ष सन 2020 - 21 या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय मुलांना प्रवेशासाठी तसेच मुलांच्या पालकांना प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे उत्पनाचे, जातीचे,नॉन क्रिमीलेअर,रहिवाशी दाखले इत्यादी कागदपत्रे गोळा करण्यासाठी तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी यावे जावे लागत आहे. त्यांना खाजगी सेवा पूर्णपणे बंद असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येण्या जाण्यास अडचणी निर्मा ण होत आहे. तसेच गौरी गणपती सणात सुध्दा महिलांना ये जा करण्यासाठी एस टी सेवा बंद असल्याने अडचण निर्माण होत आहे .तशी मागणी सतत प्रयाश्यांच्याकडून होत आहे, या मागणीचा गांभिर्याने विचार करून आजपासूनच तालूका अंतर्गत बसच्या फैऱ्या सुरू करणे संबंधीचे नियोजन आपल्या डेपो मार्फत करावे व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे.

No comments