सीबीआय करणार सुशांतसिंह प्रकरणाचा तपास: सुप्रीम कोर्ट
CBI to probe Sushant Singh case: Supreme Court
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी हे आदेश दिले.पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचं सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलं. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असेही निर्देश कोर्टाने दिले.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार कुणाला आहे, या बाबतचे प्रकरण सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील सर्वच पक्षकारांचे लिखित जबाब मागवले होते. बिहार सरकार, रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबीयांकडून आपापले लिखित जबाब सुप्रीम कोर्टाला देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने सीबीआय आणि ईडीला आपला या प्रकरणातील तपास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावे, असे जबाबात म्हटले होते.
No comments