Breaking News

मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा संपर्क प्रमुख पदी पत्रकार गोविंद मोरे यांची निवड

 

            लोणंद दि. 8 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - गोविंद मोरे यांची मानवाधिकार सुरक्षा संघ सातारा जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली. समाजामध्ये होणारे अन्याय, महिंलावर होणारे अन्याय ,अत्याचार , विटभट्टी मालक खाजगी सावकार, गुंड, विवीध शासकीय योजनापासून वंचित ठेवणारे अधिकारी, पोलीस ,कर्मचारी, न्यायालयीन कोठडीत होणारे मृत्यू, दलित समाजावर होणारे अन्याय अत्याचार सर्व शासकीय कार्यालयात होणारी अडवणूक अशा सर्व ठिकाणी मानवी हक्काचे उल्लघंन होत असते  यांसाठी मानवाधिकार संघटना महाराष्ट्रभर काम करत आहे.

            गोविंद मोरे  यांचे काम पाहता सातारा जिल्ह्यातील नागरीकांच्या अडीअडचणी सर्दंभात व नागरीकांना योग्य असा न्याय मिळवून देण्यासाठी मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अफसर शेख यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष प्रशांतजी साष्टे, प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब कुलकर्णी यांच्या निरीक्षणाने प्रदेश महासचिव सुभाष भोसले,महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख , गणेश डवरी यांच्या संमतीने तसेच महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सल्लागार  अॅड. लक्ष्मण बेडेकर ,मुंबई हायकोर्ट, व अॅड . विश्वास देशपांडे ,पुणे यांच्या सल्याने, दिपक जाधव पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, व प्रसिध्दी प्रमुख दादासाहेब येढे यांनी  गोविंद मोरे यांची सातारा  जिल्हासंपर्क प्रमुखपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडी बद्दल  पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन  सातारा जिल्ह्यासह सर्व स्तरातून त्यांचे  अभिनंदन  केले जात आहे.


No comments