निकोप हॉस्पिटल हे कोविड - १९ हॉस्पिटल म्हणुन अधिग्रहित
फलटण दि 7 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणु बाधित रुग्णांमध्ये मोठया प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. पुढील काळात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन, जिल्हाधिकारी यांच्याकडून फलटण मधील काही रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली आहेत. त्यानुसार फलटण येथील डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात येत असून लवकरच कोविड रुग्णांवर निकोप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात येतील.
जिल्ह्यात कोरोना विषाणु बाधित रुग्णांमध्ये मोठया प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. यापुढील काळात संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षता घेता, त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणु संसर्गात अधिक वाढु होवु न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. सदर बाधित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती सातारा जिल्हयात उद्भवु नये यासाठी पुर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे. त्यामुळे अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन अत्यावश्यक सेवेसाठी निकोप हॉस्पिटल फलटण हे हॉस्पिटल कोविड-१९ बाधित रुग्णांवर उपचार करणेसाठी पुढील आदेश होईपर्यत अधिग्रहित करण्यात येत असल्याचा आदेश दिले आहेत.
हॉस्पिटल मध्ये सुसज्ज असा ५० खाटांचा सुसज्ज विलगीकरण कक्ष तयार करुन सदर कक्षात व्हेंटीलेटर व इतर आवश्यक गोष्टीची तयारी ठेवण्यात यावी.तसेच रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुसज्ज ठेवुन Throat Swab घेण्याची तयारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
No comments