कोरोना चाचणी व क्वारंटाईन करण्यासाठी गेलेल्या शासकीय पथकास विरोध ; एकावर गुन्हा दाखल
फलटण दि. 21 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोविड चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकटवर्ती संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना चाचण्या कारणासाठी व त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणून, त्यांना त्यांचे काम करण्यास करण्यास विरोध केल्यामुळे बिरदेव नगर, जाधववाडी येथील एक जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, बिरदेव नगर जाधववाडी तालुका फलटण येथील व्यक्तीची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्याच्या निकटवर्ती संपर्कातील असणारे त्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यासाठी, विशाल कदम यांच्याकडे वारंवार निरोप दिले. परंतु ते जाणीवपूर्वक टेस्ट करता हाॅस्पीटल मध्ये आले नाहीत. त्यामुळे महसूल कर्मचारी, डॉक्टर व पोलीस विभागाचे कर्मचारी यांचे पथक त्या व्यक्तींच्या चाचण्या घेण्याकरता व क्वारंटाईन करण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 3 वाजता गेले असता, विशाल दिलीप कदम याने पथकासोबत वाद घातला. घराचा दरवाजा लावून घेतला व शासकीय कामात व्यत्यय आणला. त्याच्या या कृत्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास व शेजारील लोकांना रोग होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे व डॉक्टर व महसूल सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे आदेशाचे पालन केलेले नाही. त्यामुळे विशाल कदम यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments