फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सुरवडी, ता. फलटण येथील डिस्टिलरीच्या सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे भागातील ओढ्यासह विहीर, बोअरचे पिण्यासाठी वापरात असणारे पाणी दूषित झाले असून परिसरातील नागरीकांच्या आरोग्यास, ओढ्यातील जलचर व ओढ्याचे पाणी पिणाऱ्या जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सुरवडी गावालगत असणाऱ्या या डिस्टिलरीचे सांडपाणी नीरा नदीला पूर आल्यानंतर व पाऊस चालू असताना त्याचा गैरफायदा घेत ओढ्यात सोडले जात असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे ओढ्यासह विहिरीतील पाणी दूषित - होत असून, सदर पाणी पिण्याच्या जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी या दूषित पाण्याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
No comments