कोविड योद्धा पुरस्काराने प्रशांत अहिवळे यांचा सन्मान
फलटण दि 22 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - संपूर्ण देशात कोरोना विषाणू मुळे हाहाकार माजलेला आहे. या कोरोना काळात डॉक्टर्स, सफाई कर्मचारी, पत्रकार, आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी, महसूल कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, समाजसेवक यांच्यासह आपापल्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती कोरोणा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आपापल्या परीने कार्य करत आहेत. या कार्याची दखल घेत काही सामाजिक संघटनांनी या योद्ध्यांचे सन्मान केले आहेत. मंगळवार पेठ फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत शांताराम अहिवळे यांना देखील कोविड योध्दा पुरस्काराने दोन संघटनांनी सन्मानित केले.
भ्रष्टाचारविरोधी जनशक्ती संघटना तसेच मानव अधिकार संरक्षण समिती या दोन संघटनांनी प्रशांत अहिवळे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान केला आहे. त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव विजय येवले यांच्या शुभहस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार व अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तेजस काकडे, भोसले गुरुजी, निलेश मोरे, राजू वसंत काकडे, रफीक इनामदार, नवनाथ भोईटे आदी उपस्थित होते.
No comments