Breaking News

प्रोग्रेसिव्ह काॅऩ्व्हेंट स्कूलचा एस. एस. सी. बोर्ड परिक्षेत १०० % निकाल


            फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल बुधवार, दि.२९ जुलै २०२० रोजी ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाला. यात सरस्वती शिक्षण संस्थेच्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोळकी, फलटण शाळेच्या विद्यार्थ्यांना भरघोस यश प्राप्त झाले. शैक्षणिक वर्ष २०१९- २०२० पासून इयत्ता दहावीची मान्यता प्राप्त झालेल्या या स्कूलने आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम ठेवत पहिल्याच वर्षी १००% निकाल मिळवून संपूर्ण तालुक्यात दैदिप्यमान असा नावलौकिक प्राप्त केला आहे.
       अशा भरघोस यशाच्या शिखरावर स्कूलला नेण्याचे श्रेय हे स्कूलच्या कमिटीस निश्चितच जाते. संस्थापक-  श्री. भीमराव माने, अध्यक्ष-श्री.प्रदीप माने, सचिव-श्री.विशाल पवार, मार्गदर्शक व प्रेरक- श्री.पांडुरंग पवार, कोषाध्यक्ष- सौ. सविता माने, संचालिका (प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल)- सौ.प्रियांका पवार, निवृत्त केंद्रप्रमुख व समाजसेवक- श्री.सुभेदार डूबल. तसेच व्यवस्थापकीय संचालिका- सौ.संध्या गायकवाड. आणि प्राचार्या-मा.सौ.सुजाता गायकवाड या सर्वांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

शाळेच्या या १००% यशस्वी निकालात जे उज्वल तारे चमकले त्यांचे ही मुख्यतः अभिनंदन! करण्यात आले.
१) कु.प्रितम विश्वनाथ निकम -९३.६०%
२) कु.अस्मिता प्रशांत जाधव-९३.२०%
३) कु.स्वरूपा सुरेंद्र गोळे-९२%
४) कु.समर्थ संभाजी कदम-९१.६०%
५) कु.वैष्णवी प्रभाकर कवितके-९०.४०%

        या उज्वल ताऱ्यांना ज्यांनी आपल्या मार्गदर्शन व कौशल्याने घडविले अशा कुशल शिक्षकवृंद यांचे सुद्धा मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!करण्यात आले. यामध्ये श्री. अमित सस्ते सर, सौ. अहिल्या कवितके मॅडम, श्रीमती आशा भराडे मॅडम, श्री. मंगेश देशपांडे सर, सौ. तेजश्री पिसाळ मॅडम, सौ. पूनम तावरे मॅडम या सर्वांचे अभिनंदन करण्यातआले.
            सध्याची परिस्थिती व सामाजिक बांधिलकी जपता स्कूल कमिटी व शिक्षकांनी फोन करून यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व घेतल्या. स्कूल कमिटीने मार्गदर्शक शिक्षकांचा यथोचीत सन्मान केला.
            यशस्वी विद्यार्थी विद्यार्थींनींच्या शैक्षणिक भविष्याचा पुढील विचार करता प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलजने शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करिता XI सायन्स व XI कॉमर्स (इंग्रजी माध्यम) या दोन्ही शाखांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी दिली आहे.

No comments