जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल सीलबंद
![]() |
J. T. Pol's Nikop Hospital sealed |
अधिग्रहणबाबत निकोप हॉस्पिटलकडून कोणतेही सहकार्य मिळत न्हवते. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यासंदर्भात देखील निकोप हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आली होती परंतु त्याचीही दखल त्यांनी घेतली नाही. शेवटी हॉस्पिटल सिल करावे लागले. हॉस्पिटल मध्ये ॲडमिट असणाऱ्या पेशंटला वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार दुसरीकडे शिफ्ट करण्यात येईल - इन्सिडेंट कमांडर शिवाजीराव जगताप
फलटण दि. 25 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - : कोविड विषाणू संकटकाळात शासकीय यंत्रणेस सहकार्य करत नसल्याच्या कारणावरून डॉ.जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल काल रात्री उशिरा सीलबंद केले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार कोव्हीड साठी निकोप हॉस्पिटल अधिग्रहण करण्यात आलेले होते. परंतु ते हॉस्पिटल प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यासाठी डॉक्टर्स सहकार्य करत नसल्याने फलटणचे इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी निकोप हॉस्पिटल हे सील केले आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणु बाधित रुग्णांमध्ये मोठया प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. पुढील काळात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन, जिल्हाधिकारी यांच्याकडून फलटण मधील काही रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली आहेत. त्यानुसार फलटण येथील डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात आले होते. परंतु निकोप हॉस्पिटल शासनास कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्यामुळे शासनाकडून कठोर पावले उचलत, निकोप हॉस्पिटल सील करण्यात आले.https://www.gandhawarta.com/
डॉ.जे.टी.पोळ यांचे निकोप हॉस्पिटल हे कोव्हीडच्या रुग्णांसाठी अधिग्रहण केले होते. परंतु कोव्हीडच्या ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांना निकोप हॉस्पिटल मध्ये हलवण्याबाबत हॉस्पिटल मधील डॉक्टर्स व त्यांचा स्टाफ सहकार्य करत नसल्याने सदर पावले उचलावी लागली आहेत. आता निकोप हॉस्पिटल मधील ICU हा कोव्हीड रुग्णांसाठी अधिग्रहित केला असून तिथे लवकरच ऑक्सिजनची गरज असलेल्या कोव्हीड रुग्णांना हलवण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार फलटणमधील निकोप हॉस्पिटल अधिग्रहण करण्यात आले होते, परंतु अधिग्रहणबाबत हॉस्पिटलकडून कोणतेही सहकार्य मिळत न्हवते. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यासंदर्भात देखील, निकोप हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आली होती, परंतु त्याचीही दखल त्यांनी घेतली नाही. हॉस्पिटलकडून कोणतेही सहकार्य करण्यात आले नाही. त्यामुळे शेवटी हॉस्पिटल सील करण्यात आले. सध्या निकोप हॉस्पिटलमध्ये नवीन रुग्ण उपचारासाठी घेणे बंद केले आहे. पूर्वी उपचार चालू असलेले रुग्ण तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार दुसरीकडे शिफ्ट करण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी गंधवार्ताशी बोलताना सांगितले.
No comments