फलटण तालुक्यात आज 33 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 13, ग्रामीण भागात 20
33 corona positive today in Phaltan taluka; 13 in urban areas, 20 in rural areas
फलटण 25 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - आज दि. 25 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण शहर व तालुक्यात 33 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये फलटण शहरात 13 व तालुक्यातील गोखळी येथे 8 रुग्ण, नाईकबोमवाडी येथे 6 रुग्ण, शिंदेनगर 2 रुग्ण, हिंगणगाव 2 रुग्ण, राजुरी 1 रुग्ण, वरवंडं 1 रुग्ण सापडल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला गावनिहाय व पेठ निहाय तपशील खालीलप्रमाणे
फलटण शहरात एकूण 13 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत यामध्ये सोमवार पेठ फलटण येथे 4 रुग्ण सापडले, यामध्ये 11 वर्षीय, 15 वर्षी, 35 वर्षीय, 60 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
मलटण येथे 3 व्यक्तींच्या covid-19 कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 48 वर्षीय, 88 वर्षे पुरुष, 8 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे
मंगळवार पेठ येथे 2 व्यक्तींच्या कोविड चाचणी पॉझिटिव्ह आले आहे. त्यामध्ये 14 वर्षीय मुलगी व 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे
मारवाड पेठ येथे 6 वर्षीय मुलगा, भैरोबा गल्ली येथे 50 वर्षीय महिला, स्वामी विवेकानंद नगर येथे 5 वर्षीय बालिका, जिंती नाका येथे 28 वर्षीय महिला यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
फलटण तालुक्यातील गोखळी येथे 8 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामध्ये 64 वर्षीय, 34 वर्षीय, 42 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय, 68 वर्षीय, 10 वर्षीय, 15 वर्षीय, 11 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
नाईकबोमवाडी येथे 6 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत यामध्ये 22 वर्षीय, 52 वर्षीय महिला, 32 वर्षीय, 50 वर्षीय, 53 वर्षीय, 65 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
राजुरी येथे 28 वर्षीय पुरुष, शिंदेनगर येथे 27 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष, वरवंड येथे 45 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथे 38 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
No comments