नीरा येथून विवाहिता बेपत्ता

लोणंद (गंधवार्ता वृत्तसेवा) - नीरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील वार्ड नंबर 6 मधील सौ.नंदा अविनाश सूर्यवंशी हे 9 जुलै 2020 पासून बेपत्ता आहेत.
सदर बेपत्ता प्रकरणी नीरा पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल केली असून, त्या सौ.नंदा अविनाश सूर्यवंशी यांचे वर्णन पुढीलप्रमाणे उंची पाच फूट चार इंच, रंग सावळा, अंगाने मध्यम, नाक सरळ, केस काळे, चेहरा गोल, अंगात निळ्या कलरची साडी, निळा ब्लाऊज, पायात चप्पल असे आहे.
अधिक तपास नीरा क्षेत्राचे एस बी होळकर करीत आहेस.
No comments