Breaking News

भारताचा एकाच दिवसात 9 लाखांहून अधिक कोविड चाचण्यांचा उच्चांक

 

        नवी दिल्‍ली 20 ऑगस्‍ट 2020 सातत्यपूर्ण कामगिरी करत, भारताने कोविडच्या दैनंदिन चाचण्यांमध्ये एक नवीन उच्चांक नोंदवला आहे.

प्रथमच एकाच दिवसात 9 लाखाहून अधिक कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 9,18,470 कोविड चाचण्या करण्यात आल्या. दररोज 10 लाख नमुने तपासण्याच्या निर्धाराच्या दिशेने अभूतपूर्व वाढ होण्याची भारताला आशा आहे.

या कामगिरीमुळे एकूण चाचण्यांची संख्या 3.25 कोटींपेक्षा जास्त (3,26,61,252) झाली आहे.

देशभरातल्या विस्तारित निदान प्रयोगशाळा आणि चाचणी सुलभ करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांमुळे सध्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या केंद्रित कामगिरीमुळे प्रति दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्यांची (टीपीएम) संख्या झपाट्याने वाढून 23668 झाली आहे. ही टीपीएमची संख्या सातत्याने वाढत आहे. 

नियमितपणे वाढणाऱ्या चाचण्यांमुळे बाधित रुग्णांच्या दरात कमालीची घट झाली आहे. मोठ्या संख्येने चाचण्या घेण्यात आल्यामुळे सुरुवातीला बाधित रुग्णांचा दर वाढेल, मात्र अनेक राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे कि त्वरित अलगीकरण, प्रभावी शोधकार्य आणि वेळेवर नैदानिक व्यवस्थापन यासारख्या इतर उपायांमुळे अखेरीस तो कमी होईल.

राष्ट्रीय सरासरी 8% पेक्षा कमी झाली असून, असे 26 राज्ये / केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यांनी राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी दर नोंदवला आहे. 

नैदानिक प्रयोगशाळांच्या राष्ट्रीय नेटवर्कमध्येही सातत्याने वाढ होत आहे. सरकारी क्षेत्रात 977 प्रयोगशाळा आणि 517 खासगी प्रयोगशाळा असून आज एकूण प्रयोगशाळांची संख्या 1494 पर्यंत वाढली आहे. यामध्ये 

• रिअल-टाइम आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : 764 (सरकारी : 453 + खाजगी: 311)

• ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 611 (शासकीय: 490 + खाजगी: 121)

• सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा :  119 ((सरकारी: 34  + खासगी: 85)

No comments