Breaking News

फलटण तालुक्यात 15 कोरोना पॉझिटिव्ह

 

शहर - पोलीस कॉलनी 1, कोळकी 5, नांदल 4, ठाकूरकी 2,  गोळेगाव 1,  पाडेगाव 1,  हिंगणगाव 1

        फलटण 21 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) -  आज दि. 21 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या चाचणी अहवालानुसार फलटण तालुक्यात 15 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये फलटण शहरात पोलीस कॉलनी 1 तर तालुक्यात कोळकी 5, नांदल 4, ठाकूरकी 2,  गोळेगाव 1,  पाडेगाव 1,  हिंगणगाव 1 व्यक्ती कोरोना बाधित सापडल्या असल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. https://www.gandhawarta.com/

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला गावनिहाय व  पेठ निहाय  तपशील खालीलप्रमाणे

फलटण शहरामध्ये पोलीस कॉलनी येथे 31 वर्षीय पुरुष पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

        फलटण तालुक्यात कोळकी येथे हे 5 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. यामध्ये 20 वर्षीय, 45 वर्षीय, 39 वर्षीय, 70 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

        नांदल येथे 4 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये हे 6 वर्षीय 55 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय, 47 वर्षीय महिलांचा समावेश आहे.

        ठाकूरकी येथे 2 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. यामध्ये 20 वर्षीय पुरुष 41 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

        तालुक्यात गोळेगाव येथे 23 वर्षीय पुरुष, पाडेगाव येथे 41 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथे 65 वर्षीय पुरुष यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

No comments