Breaking News

फलटण तालुक्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह

 

            फलटण दि 11 ऑगस्ट (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 11 ऑगस्ट रोजी फलटण येथे घेण्यात आलेल्या रॅपिड ॲंटीजेन चाचणी मध्ये एकूण 9 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 3 व्यक्ती, निरगुडी 1 कोळकी 1, तांबखडा (जाधववस्ती) आसू 2, विडणी 2 व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

            दि. 11 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या रॅपिड ॲंटीजेन चाचणी मध्ये एकूण 9 व्यक्तींचे  रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये फलटण शहरातील मंगळवार पेठ येथील 31 व 23 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 65 वर्षीय महिला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

            निरगुडी तालुका फलटण येथील 32 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोळकी तालुका फलटण येथील 54 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.   तांबखडा (जाधववस्ती) आसू येथील 20 वर्षीय, 25 वर्षीय युवतींची कोविंड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विडणी ता. फलटण येथील 55 वर्षीय , 30 वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

No comments