फलटण शहरात 9 व वाखरी येथे 1 कोरोना पॉझिटिव्ह
फलटण 3 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यासह शहरातील कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून, काल दि. 2 ऑगस्ट रोजी रात्री आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण शहरात मंगळवार पेठ - 6 रुग्ण, मलटण -1 रुग्ण, रविवार पेठ - 2 रुग्ण असे 9 रुग्ण व वाखरी ता. फलटण येथे 1 असे एकूण 10 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दि. 2 ऑगस्ट रोजी रात्री आलेल्या कोरोना अहवालानुसार फलटण तालुक्यातील वाखरी येथील 21 वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्हआली आहे. तर फलटण शहरातील मंगळवार पेठ येथील 55, 32, 75 वर्षीय महिला तसेच 55, 34, 50 वर्षीय पुरुषांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मलटण येथील 52 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रविवार पेठ येथील 27, 36 वर्षीय महिलांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 141 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
No comments