Breaking News

फलटण शहरात 7 ग्रामीण भागात 5 ; एकूण 12 पॉझिटिव्ह

 

        Phaltan city 7 rural areas 5; A total of 12 positives

    फलटण 16 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) -  आज दि. 16 ऑगस्ट रोजी आलेल्या  कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण तालुक्यात आज 12  व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये फलटण शहरातील 7, साखरवाडी 2, होळ 2, पिंपरी-चिंचवड (साखरवाडी)1 व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. 

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला गावनिहाय तपशील खालीलप्रमाणे

फलटण शहरातील उमाजी नाईक चौक  येथे 3 व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह सापडल्या आहेत, यामध्ये 18 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय, 75 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

मलटण येथे 2 व्यक्ती   कोविड पॉझिटिव्ह सापडल्या आहेत, यामध्ये 32 वर्षीय व 70 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

 मंगळवार पेठ फलटण येथे 42 वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 मारवाड पेठ फलटण येथे 65 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 साखरवाडी तालुका फलटण येथे दोन व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 13 वर्षीय व 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 होळ तालुका फलटण येथे 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 23 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

  पिंपरी-चिंचवड (साखरवाडी) येथील 70 वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

No comments