Breaking News

रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास 68 टक्क्याच्या नवीन उच्च स्तरावर

            नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2020 - कोविड-19 च्या रुग्णांच्या बरे होण्याच्या दरात सतत होणारी वृद्धी आणि जागतिक परिस्थितीच्या तुलनेत भारतातील कमी मृत्यू दर या दोन महत्वपूर्ण कामगिरींसोबत भारत कोविड-19 व्यवस्थापनाच्या मार्गावर आगेकूच करत आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 68% तर मृत्यू दर 2.05% या नवीन पातळीवर पोहचल्याने कोविड-19 रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे सुनिश्चित झाले आहे. या दोन महत्वपूर्ण कामगिरींमुळे भारतात बरे झालेल्या रूग्णांची संख्या आणि सक्रिय रुग्णांमधील फरक (7.7 लाखांहून अधिक) वाढला आहे.

            गेल्या 24 तासात कोविड-19 चे 49,769 रुग्ण बरे झाल्याने कोविड-19 च्या बरे झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा  13,78,105 वर पोहोचला आहे.

            रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि केंद्राने जारी केलेल्या क्लिनिकल ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट असलेल्या स्टँडर्ड ऑफ केअरच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांवर कार्यक्षम उपचार करण्यावर भर दिला गेला आहे. गेल्या दोन आठवड्यात सरासरी दररोज रुग्ण बरे (7 दिवसांची सरासरी) होण्याच्या संख्येत वाढ होऊन ती 26000 वरून 44000 झाली आहे.
केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारने केलेल्या केंद्रित आणि समन्वित नियंत्रित निरंतर प्रयत्न, व्यापक चाचणीयांच्यासह पर्यवेक्षित विलगीकरण आणि प्रभावी उपचार यामुळे सक्रिय रुग्णांच्या टक्केवारीतील घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वृद्धी झाली आहे.
दररोज बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात लक्षणीय आणि निरंतर वृद्धी होत आहे.

            कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA

        तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in आणि @CovidIndiaSeva .

        कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे

No comments