फलटण तालुक्यात 5 पॉझिटिव्ह ; गुणवरे 1, सोनवडी 1, पाडेगाव 1 व शहरात 2

फलटण 8 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 7 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण तालुक्यात 5 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये फलटण शहरातील 2, गुणवरे 1, पाडेगाव 1, सोनवडी खु. 1 व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दि. 7 ऑगस्ट रोजी रात्री आलेल्या कोरोना अहवालानुसार फलटण तालुक्यात एकूण 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये फलटण शहरातील मंगळवार पेठ येथील 17 वर्षी युवती, स्वामी विवेकानंद नगर, फलटण येथील 30 वर्षीय महिला यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
फलटण तालुक्यातील गुणवरे येथील 24 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पाडेगाव येथील 29 वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर सोनवडी खुर्द येथील 55 वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
दरम्यान जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 199 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
No comments