फलटण तालुक्यात 4 कोरोना पॉझिटिव्ह
फलटण 22 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - आज दि. 22 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 4 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामध्ये फलटण शहरातील दोन व कोळकी तालुका फलटण येथील एका व्यक्तीचा समावेश आहे कोरोना बाधित रुग्ण सापडले असल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
आज फलटण तालुक्यात सापडलेले 4 कोविड रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
फलटण शहरात मलटण येथे 75 वर्षीय पुरुष आणि शहरातील 21 वर्षे महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
कोळकी तालुका फलटण येथे 6 वर्षीय बालक व 52 वर्षीय पुरुषांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
No comments