Breaking News

48 पॉझिटिव्ह ; फलटण तालुक्यात दिवसभरात सर्वाधिक रुग्ण

 

48 covid positives in Phaltan taluka during the day

        फलटण दि. 18 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - आज दि. 18 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेल्या कोविड टेस्ट रिपोर्ट नुसार फलटण तालुक्यात एकूण 48 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आज रात्री आलेल्या अहवालामध्ये एकूण 34 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत आणि आज सकाळी जाहीर करण्यात आलेले 14 अहवाल असे एकूण आज 48 कोविड रुग्ण सापडले आहेत. रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये रेग्युलर लॅब चाचणी नुसार 13 जणांचे अहवाल कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. तर रॅपिड अँटिजेन टेस्ट मध्ये 21 जणांचे अहवाल कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला गावनिहाय तपशील खालीलप्रमाणे

        आज दि. 18 ऑगस्ट रोजी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये फलटण शहरात 6 तर गोखळी 8,  पवारवाडी 1, गुणवरे 2, कांबळेश्वर 1,  राजुरी 1, नाईकबोमवाडी 1,   साखरवाडी 2, वाठार निंबाळकर 1,  तांबखडा  3, जिंती 1, निंभोरे 2,  जाधववाडी 1, गिरवी 1, टाकूबाईचीवाडी 1, तावडी 1, कोळकी 1 असे तालुक्यात एकूण 34 जणांचे अहवाल covid-19 पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.

        फलटण येथे एकूण 6 रुग्णांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. मारवाड पेठ फलटण येथे  69 वर्षीय, 23 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ 56 वर्षीय पुरुष,  कसबा पेठ 34 वर्षीय महिला यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, तर रॅपिड अँटिजेन टेस्ट मध्ये मलठण येथील 65 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरुषांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

        तांबखडा येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या निकटवर्ती संपर्कातील 3 व्यक्तींच्या रेग्युलर कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 27 वर्षीय, 33 वर्षीय व 44 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

जिंती तालुका फलटण येथे 44 वर्षीय पुरुष, निंभोरे तालुका फलटण येथील 25 वर्षीय पुरुष, जाधववाडी तालुका फलटण येथील 55 वर्षीय महिला, गिरवी तालुका फलटण येथील 32 वर्षीय पुरुष,  टाकूबाईचीवाडी 56 वर्षीय पुरुष, तावडी 70 वर्षीय महिला यांच्या रेग्युलर कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत.

    गोखळी तालुका फलटण येथे 8 व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट  पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 15 वर्षीय, 17 वर्षीय,43 वर्षीय, 70 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय, 38 वर्षीय, 25 वर्षीय व 85 वर्षीय महिलांचा समावेश आहे.

    गुणवरे तालुका फलटण येथे  2 व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट  पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 13 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

साखरवाडी तालुका फलटण येथे  2 महिलांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट  पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

पवारवाडी तालुका फलटण येथे 58 वर्षीय महिला, कोळकी येथे 1 पुरुष, कांबळेश्वर येथे 45 वर्षीय पुरुष,  राजुरी येथे 75 वर्षीय पुरुष, नाईकबोमवाडी येथे 60 वर्षीय पुरुष, निंभोरे येथे 52 वर्षीय पुरुष, वाठर निंबाळकर येथे 1 पुरुष यांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.

        आज दि.18 ऑगस्ट रोजी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण तालुक्यात 14 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये फलटण शहरातील 13 व विडणी  येथील 1 व्यक्तीचा समावेश आहे. फलटण मध्ये खाटीक गल्ली 7,  मारवाड पेठ 1,  रिंग रोड 1, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 1, व्यक्तीच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. 

No comments