संजय गांधी निराधार योजना समितची बैठक संपन्न 27 अर्ज मंजूर
सातारा दि. 11 : संजय गांधी निराधार योजना समितची बैठक पार पडली असून या बैठकीत 27 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार आशा होळकर यांनी दिली आहे.
या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे ग्रामीण व शहरी विभागातील विधवा 6 अर्ज, अपंग 5, असे एकूण 14 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तसेच श्रावणबाळ योजनेचे शहरी व ग्रामीण विभागाचे एकूण 12 अर्ज व इंदिरा गांधी वृद्धपाकळ योजनेचा 1 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
No comments