Breaking News

फलटण तालुक्यात 25 पॉझिटिव्ह; विडणी 8 गुणवरे 3 गिरवी 6, तडवळे 7, फलटण 1

            फलटण 10 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) -  फलटण तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे, काल आलेल्या कोविड अहवालामुळे तर फलटण तालुका हादरून गेला आहे. दि. 9 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आलेल्या  कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण तालुक्यात 25 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

            दि. 9 ऑगस्ट रोजी रात्री आलेल्या कोरोना अहवालानुसार फलटण तालुक्यात एकूण 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये फलटण तालुक्यातील विडणी येथे 8 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून यामध्ये  66, 11, 13, 15 वर्षीय पुरुष 14, 30, 35, 50 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. 

 फलटण तालुक्यातील  गुणवरे येथे 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून यामध्ये 32, 20, 62  वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 

फलटण तालुक्यातील गिरवी येथे  6 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून यामध्ये 35, 40, 62, 12  महिला, 10 वर्षाचा बालक, 35 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 

फलटण तालुक्यातील तडवळे येथे  7 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून यामध्ये 11 वर्षीय, 9 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय पुरुष, 22, 55 वर्षीय व 32, 36 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. 
 शुक्रवार पेठ, फलटण येथील 58 वर्षीय पुरुषाची कोरोना पॉझिटिव्ह चाचणी पॉझिटिव्ह आली आहे

No comments