Breaking News

सातारा जिल्ह्यात 226 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 46 जणांचा अहवाल कोरोना बाधित

 

226 citizens in Satara district discharged today; 46 reported corona disruption

     सातारा दि.18 (जिमाका) :  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 226   नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा यांच्या अहवालानुसार 46 जणांचा  अहवाल कोरोना बाधित आला असून, 743 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

      विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  जावली तालुक्यातील 5, कराड तालुक्यातील 41, खंडाळा तालुक्यातील 27,खटाव तालुक्यातील 3, कोरेगांव तालुक्यातील 20, महाबळेश्वर तालुक्यातील 26, माण तालुक्यातील 2, पाटण तालुक्यातील  21, फलटण तालुक्यातील 26, सातारा तालुक्यातील 29, वाई तालुक्यातील 26  असे एकूण 226 नागरिकांचा समावेश आहे.

46 जणांचा अहवाल कोरोना बाधित

                स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा यांच्या अहवालानुसार 46 जणांचा  अहवाल कोरोना बाधित आला आहे. या अहवालामध्ये,

                जावली तालुक्यातील भणंग येथील 1,कुडाळ 3, खर्शी 1, मोरघर 1.

                कराड तालुक्यातील चोरे येथील 1.

                खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 2, स्टार सिटी येथील 1, सुदर नगरी येथील 1.

               खटाव तालुक्यातील अंबवडे येथील 1, गुरसाळे येथील 1, मायणी येथील 1.

                कोरेगांव तालुक्यातील कुमठे येथील 1, सोनके येथील 1, अपशिंगे येथील 1, सोळशी येथील 1.

                माण तालुक्यातील भालवडी येथील 1.

                पाटण तालुक्यातील सणबुर येथील 1, पुरफोळे  येथील 1.

                फलटण तालुक्यातील मारवाड पेठ येथील 1, सोमवार पेठ   1, रविवार पेठ   1, विडणी   1, रिंगरोड 1, खाटीक गल्ली 7, मलठण येथील 2.

                सातारा तालुक्यातील गावडी येथील 1, मालगाव 1, कोडोली 1, संभाजी नगर 1, कामाठीपुरा 1, रामचौक 1, नेले 1, गणेश कॉलनी 1. मंगळवार पेठ येथील 1.

                वाई तालुक्यातील उडतरे येथील 2.

743 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

                स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 20, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 76, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 33, कोरेगाव 54, वाई येथील 35, खंडाळा येथील 60, रायगाव 66,  मायणी येथील 54, महाबळेश्वर येथील 30, दहिवडी येथील 30,पानमळेवाडी येथील 151, खावली येथील 31 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 103 असे एकूण 743 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुभाष चव्हाण यांनी दिली.


 


घेतलेले एकूण नमुने -- 37430


एकूण बाधित -- 7929


घरी सोडण्यात आलेले --- 4449


मृत्यू -- 260


उपचारार्थ रुग्ण -- 3220


No comments