Breaking News

209 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 596 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 

        सातारा दि.19  (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 209    नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 596 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

                विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  जावली तालुक्यातील 7, कराड तालुक्यातील 41, खंडाळा तालुक्यातील 47,खटाव तालुक्यातील 16, कोरेगांव तालुक्यातील 12, महाबळेश्वर तालुक्यातील 1, माण तालुक्यातील 6, पाटण तालुक्यातील  10, फलटण तालुक्यातील 7, सातारा तालुक्यातील 38, वाई तालुक्यातील 24  असे एकूण 209 नागरिकांचा समावेश आहे.   

596 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

                स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 80, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 31, कोरेगाव 5, वाई येथील 81, खंडाळा येथील 26, रायगाव 69,  मायणी येथील 101, महाबळेश्वर येथील 63, पानमळेवाडी 8, पाटण येथील 14, खावली येथील 49 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 59 असे एकूण 596  जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने -- 38026

एकूण बाधित -- 8275

घरी सोडण्यात आलेले --- 4658

मृत्यू -- 269

उपचारार्थ रुग्ण -- 3348

No comments