फलटण तालुक्यात 18 कोरोना पॉझिटिव्ह
18 corona positive in Phaltan taluka
फलटण 16 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 15 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण तालुक्यात आणखी 18 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये फलटण शहरातील 11, आदर्की 2, जाधववाडी, नांदल, मुरूम, मलवडी, मुंजवडी या गावांमध्ये प्रत्येकी 1 व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला गावनिहाय तपशील खालीलप्रमाणे
फलटण शहरातील मारवाड पेठ येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या निकटवर्ती संपर्कातील 5 व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 20 वर्षीय, 24 वर्षीय, 28 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय, 72 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
मंगळवार पेठ येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या निकटवर्ती संपर्कातील 3 संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यामध्ये 35 वर्षीय, 49 वर्षीय, 66 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
शुक्रवार पेठ येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या निकटवर्ती संपर्कातील 2 संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यामध्ये 18 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
फलटण तालुक्यातील आदर्की येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या निकटवर्ती संपर्कातील 2 संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यामध्ये 35 वर्षीय, 44 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.
बिरदेवनगर, जाधववाडी ता. फलटण येथे सारी या रोगाची लक्षणे असणाऱ्या 64 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
नांदल ता. फलटण येथे सारी या रोगाची लक्षणे असणाऱ्या 32 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मुरूम ता. फलटण येथे सारी या रोगाची लक्षणे असणाऱ्या 31 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मलवडी ता. फलटण येथे सारी या रोगाची लक्षणे असणाऱ्या 40 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मुंजवडी ता. फलटण येथे सारी या रोगाची लक्षणे असणाऱ्या 42 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
No comments