Breaking News

फलटण तालुक्यात आज 18 कोरोना पॉझिटिव्ह


            फलटण 3 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 3 ऑगस्ट रोजी आलेल्या  कोविड (covid-19) च्या अहवालानुसार 18 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. फलटण शहरात एकूण 8 रुग्ण, पाडेगाव येथे 5 रुग्ण, कुरवली येथे 2 रुग्ण, राजाळे येथे 1 रुग्ण, तडवळे येथे 1 रुग्ण व फरांदवाडी येथे 1 रुग्ण पॉझिटिव्ह सापडला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. फलटण तालुक्यासह शहरातील कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

            दि. 3 ऑगस्ट रोजी  आलेल्या कोरोना अहवालानुसार, फलटण शहरातील 8 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे 5 रुग्ण, कुरवली येथे 2 रुग्ण, राजाळे येथे 1 रुग्ण, तडवळे येथे 1 रुग्ण व फरांदवाडी येथे 1 रुग्ण पॉझिटिव्ह सापडला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

            फलटण शहरासह तालुक्यात कोरोना  रुग्ण वाढू लागले असून नागरिकांनी  दक्षता घेणे आवश्यक आहे. नाही तर भविष्यात हा आकडा वाढू शकतो, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे, बाहेर पडले तरी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे, तोंडाला मास्क वापरावा,  घरी आल्यानंतर प्रथम हात पाय स्वच्छ धुवावेत. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे म्हणजे कोरोना संसर्ग आपण थोपवू शकतो. 

2 comments: