Breaking News

फलटण तालुक्यात आणखी 12 रुग्ण; दिवसभरात 51 पॉझिटिव्ह

 

        फलटण 20 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) -  आज दि. 20 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये आणखी नवीन  12 रुग्ण  पॉझिटिव्ह सापडले आहेत.  त्यामुळे आज दिवसभरात  जाहीर करण्यात आलेल्या  रुग्णांची संख्या 51 वर पोहचली आहे . आज दुपारी जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण तालुक्यात 39 कोरोना बाधित रुग्ण सापडले असल्याची माहिती गंधवार्ता ला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.

        आज सायंकाळी जाहीर जाहीर करण्यात आलेल्या कोविडच्या 12 रुग्णांमध्ये मंगळवार पेठ फलटण येथील 4 जणांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 22 वर्षीय महिला, 39 वर्षीय, 40 वर्षीय, 34 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

        साखरवाडी तालुका फलटण येथील 3 जणांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 51 वर्षीय, 51 वर्षीय, 40 वर्षीय 25 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

        आदर्की बुद्रुक येथे 45 वर्षीय पुरुष, तरडफ येथे 81 वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर फलटण येथे 64 वर्षीय पुरुष आणि शहरातच 49 व 48 वर्ष पुरुषांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

आज फलटण तालुक्‍यात सापडलेले 51 कोविड रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. 

फलटण शहरात 26 व्यक्ती,  खटकेवस्ती येथे 5 व्यक्ती, तांबखडा येथे 5 व्यक्ती, मुंजवडी येथे हे 4 व्यक्ती, मिरढे येथे 3 व्यक्ती,  गोखळी 1,  नाईकबोमवाडी 1, विडणी 1, आदर्की बु. 1, साखरवाडी 3, तरडफ 1 व्यक्ती कोरोना बाधित सापडल्या आहेत.

No comments