फलटण तालुक्यात 10 पॉझिटिव्ह; मारवाड पेठ 2, जिंती नाका 1, मंगळवार पेठ 1 रविवार पेठ 1 व इतर 5

फलटण 9 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 8 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण तालुक्यात 11 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये फलटण शहरातील 5, कोळकी 1, गोळेगाव 3, निंभोरे 1 व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दि. 8 ऑगस्ट रोजी रात्री आलेल्या कोरोना अहवालानुसार फलटण तालुक्यात एकूण 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये फलटण शहरातील मंगळवार पेठ येथील 21 वर्षीय युवक, रविवार पेठ येथील 58 वर्षीय पुरुष, जिंती नाका फलटण येथील 32 वर्षीय पुरुष, मारवाड पेठ फलटण येथील 49 व 53 वर्षे पुरुष यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
गोळेगाव तालुका फलटण येथील 24, 24, 23 वर्षीय पुरुष यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. कोळकी तालुका फलटण येथील 36 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. निंभोरे येथील 36 वर्षे पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
No comments