Breaking News

निंबळक येथे तरुणीचा घातपात ; प्रेत ब्लॅंकेटमध्ये दोरीने बांधलेल्या अवस्थेत विहीरीमध्ये सापडले

छायाचित्रातील मयत तरुणी जर कोणाच्या ओळखीची असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - निंबळक गावच्या हद्दीत जे के ढाब्याजवळ असलेल्या ओढ्याच्या कडेला विहीरीत तरुणीचे प्रेत एका रंगीत ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून नायलॉनच्या दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळुन आले आहे. प्रथम दर्शनी हा घातपाताचा प्रकार दिसत असून फलटण ग्रामीण पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केलेला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,दि १ जुलै २०२०  रोजी दुपारी ३.४५ वा चे पुर्वी नक्की तारीख वेळ माहीत नाही कोणी तरी अज्ञात इसमानी अज्ञात स्त्री वय अंदाजे २० ते २५ वर्ष हिचा अज्ञात कारणासाठी कशाने तरी तिला जिवे ठार मारून, तिचा खुन करून रंगीत ब्लॅंकेट मध्ये नायलॉनच्या दोरीने बांधून मौजे निंबळक ता. फलटण गावचे हद्दीत जे के ढाब्याच्या जवळ असलेल्या ओढ्याचे कडेला, फलटण ते पंढरपुर जाणारे रोडपासून बनकर वस्तीकडे जाणारे रोडचे कडेला, ओढ्यात, सिताराम शंकर धुमाळ याचे विहीरीत आणुन टाकले असल्याची फिर्याद पोलीस पाटील समाधान कळसकर यांनी दिली आहे.

पोलीसांनी व पोलीस पाटील यांनी ब्लॅंकेट मध्ये गुंडाळलेले प्रेत बाहेर काढले व सोडून पाहिले असता, त्या ब्लॅंकेट मध्ये एक स्त्री जातीचे प्रेत वय अंदाजे २०  ते २५ वर्षे असलेले त्याची जीभ व डोळे बाहेर आलेले असुन, चेहरा व उजवा हात काळपट पडलेला दिसला. अंगात काळ्या रंगाची प्लाजो पैन्ट व गुलाबी रंगाचा टी शर्ट होता, त्यावर इंग्रजीत FEINIST ARE NOT ONLY WOMEN असे इंग्रजीत लिहलेले असुन, त्यामध्ये गुलाबाचे फुलाचे चित्र असलेला टी शर्ट होता.   प्रेताची पाहणी केली व त्याच्याओळखी बाबत जमलेल्या लोकांकडे चौकशी केली. परंतु जमलेल्या लोकांनी सदर स्त्री जातीचे प्रेत ओळखीचे नसलेचे सांगितले.  तेव्हा पोलीस पाटील यांची खात्री झाली की सदर अनोळखी मयत स्त्रीस, कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कशाने तरी तिला ठार मारून, तिचा खुन केला आहे व तिचे प्रेत एका रंगीत ब्लॉकेट मध्ये नायलॉनच्या दोरीने बांधुन सिताराम शंकर ढमाळ यांचे विहीरीत आणुन टाकले असल्याने पोलीस पाटील समाधान कळसकर यांनी अज्ञात इसमांची विरुद्ध फिर्याद दिली.

No comments