राजगृह तोडफोड करणार्या माथेफिरुंना तात्काळ अटक करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात करावा!
![]() |
निवेदन देताना विजय येवले,हरिश काकडे, तेजस काकडे व कैलास रणदिवे. |
फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी पुस्तकांसाठी घर बांधले ते हेच राजगृह ! आज भारत देश ज्या संविधानाच्या अंमलबजावणीवर चालतो त्या संविधानाचा मसुदा याच निवासात बनविला होता. त्या राजगृहाची तोडफोड करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांच्या या निवास स्थानाची "राजगृहाची" तोडफोड करणार्या सडक्या बुध्दीच्या माथेफीरुंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून प्रांताधिकारीसाहेब फलटण यांना रीपाई फलटण मधील इतर संघटनांच्या वतीने निवेदन देवुन निषेध नोंदवण्यात आला व राजगृह तोडफोड करणार्या माथेफिरुंना तात्काळ अटक करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात करावा अशी मागणी करण्यात आली.
No comments