Breaking News

फलटण मध्ये मुस्लिम तब्लिग समाज बांधवांच्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद


फित कापून रक्तदान शिबीराचे उदघाटन करताना तब्लिकी समाज सातारचे अमीरसाहब अनिसभाई तांबोळी व अन्य मान्यवर
फलटण -  : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तसाठा कमी झाल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत फलटण शहरासह तालुक्यातील मुस्लिम तब्लिग समाज बांधवांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करुन ३२५ जणांनी सातारा येथील दोन रक्त पेढ्यांना रक्त उपलब्ध करुन दिले आहे.
         फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी प्रा. विद्यामंदिर (बाजारे मास्तर शाळा) येथे आयोजित केलेल्या या रक्तदान शिबीराचे उदघाटन तब्लिक जमात सातारचे अमीरसाहब अनिसभाई तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, त्यानंतर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शिबीरस्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वागत करताना अमीरसाहब तांबोळी व अन्य मान्यवर.
      या रक्तदान शिबीरामध्ये करोना नियंत्रणासाठी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले असून फलटण शहर व तालुक्यामधील नागरिकांनी सदरील रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद दिला. मुस्लिम समाज बांधवांसह अन्य समाज बांधवांनीही या शिबीरात रक्तदान केले ३२५ रक्त दात्यांनी रक्तदान केले,  सातारा येथील अक्षय व  बालाजी या दोन रक्त पेढ्यांनी रक्त स्वीकारले.


No comments