Breaking News

सरडे, गुणवरे व मलठण येथे कोरोना बाधीत रुग्ण


        फलटण दि.9 जुलै (गंधवार्ता वृत्तसेवा) -  फलटण तालुक्यात आज तीन व्यक्तींच्या कोविड 19 च्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. गुणवरे ता. फलटण,  सरडे ता. फलटण आणि मलटण, फलटण येथील प्रत्येकी एक व्यक्ती कोरोना बाधित सापडला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
        मौजे गुणवरे येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ६३ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मौजे सरडे ता. फलटण येथील २८ वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.सदर महिलेचे पती यांचीही कोविड चाचणी पुणे येथे पॉझिटिव्ह आली असल्याची हिस्ट्री आहे.
        पुणे येथून मलठण येथे आलेल्या ५८ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

No comments