Breaking News

बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार


            अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या(16 जुलै) रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी 1 वाजता पाहता येणार आहे. बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. लॉकडाऊनच्या आधी बारावीची परीक्षा संपली होती. 

            उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर 16 जुलै रोजी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली होती. यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त 5 लाख 85 हजार 736 विद्यार्थी विज्ञान शाखेचे होते, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी होते. आता या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.
            खालील वेबसाईटसवर पाहता येईल बारावीचा निकाल

www.mahresult.nic.in  
www.hscresult.mkcl.org  
www.maharashtraeduction.com

No comments