वैशाली शिंदे यांचा इंडिया रेकॉर्ड्स संस्थे कडून सन्मान
फलटण:- इंडिया रेकॉर्ड्स या संस्थेमार्फत भारतातील विशेष प्राविण्य असणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. फलटणच्या आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा सौ वैशाली शिंदे यांना त्यांनी कोरोना कालखंडात राबवलेल्या उपक्रमांबद्दल तसेच दिलेल्या योगदानाबद्दल इंडिया रेकॉर्ड्स यांच्याकडून सन्मानित करण्यात आले आहे.
कोरोना कालखंडात शासनाने सुरू केलेल्या अवेअरनेस कॅम्पेनच्या अनुसार शैक्षणिक क्षेत्रात, वैशाली शिंदे यांनी आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूल व व्ही. एस. फौंडेशन च्या माध्यमातून सोशल डिस्टंसिंग चे पालन करत, शैक्षणिक क्षेत्रात नवीन धोरणाचा अवलंब करून, ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू केले, तसेच ऑनलाईन स्पर्धा, क्लासेस घेऊन सामाजिक सेवा दिल्या. कोरोना कालखंडात राबवलेल्या या उपक्रमांबद्दल तसेच दिलेल्या योगदानाबद्दल इंडिया रेकॉर्ड या संस्थेच्या वतीने सौ. वैशाली शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल वैशाली शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments