Breaking News

फलटण तालुक्यात 4 कोरोना बाधीत ; कोरोनाचे शतक



फलटण (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) -  फलटण तालुक्यात आज 4 कोरोनाचे बाधित रुग्ण सापडले असून, फलटण तालुक्याची कोरोना बधितांची संख्या 100 झाली आहे. कोळकी येथे दोन  महिलांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर  आंदरुड येथे एक मुलगा आणि गुणवरे येथे एक महिला पॉझिटिव्ह सापडली  असल्याची माहिती शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

कोळकी येथे राहणाऱ्या  पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील २ महिलांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये ४५ व २३ वर्षीय महिलांचा समावेश आहे. आंदरूड येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील १४ वर्षांचा मुलगा पॉझिटिव्ह आला आहे. तर गुणवरे येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ४९ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

No comments