Breaking News

फलटण तालुक्यात 3 कोरोना बाधीत ; फलटण शहर 1, आसू 1 व उपळवे 1


            फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - आज आलेल्या covid-19 कोविड च्या चाचणी रिपोर्ट नुसार, फलटण शहरात एक तर फलटण तालुक्यात दोन असे एकूण 3 रुग्ण बाधित सापडले आहेत. आसू तालुका फलटण येथे एक व उपळवे येथे एक कोरोना बाधित रुग्ण सापडला असून फलटण शहरात लक्ष्मीनगर या भागात कोरोना रुग्ण सापडला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

            मौजे आसू येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या (पत्नी) निकट संपर्कातील ३० वर्षीय पुरुषाची (पती) कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मौजे उपळवे येथील येथील ५२ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर फलटण शहरातील लक्ष्मीनगर भागातील ४६ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

1 comment: