Breaking News

सरडे ता. फलटण येथे 2 कोरोना बाधीत रुग्ण


        फलटण दि.10 जुलै (गंधवार्ता वृत्तसेवा) -  फलटण तालुक्यात आज 2 व्यक्तींच्या कोविड 19 च्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सरडे ता. फलटण  येथील प्रत्येकी दोन व्यक्ती कोरोना बाधित सापडल्या असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर  यांनी दिली आहे.

        फलटण तालुक्यातील सरडे येथील 50 वर्षीय महिला व 55 वर्षे पुरुष यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच आज सायंकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 12 नागरिकांच्या अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर  यांनी दिली आहे.

No comments