Breaking News

फलटण तालुक्यात 23 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरातील बधितांचा जनसंपर्क मोठा असल्याने चिंता



        फलटण  दि. 20 जुलै (Gandhawarta News Service) - फलटण तालुक्यात आज एकूण 23 कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. त्यात  फलटण शहरातील 8 जणांचा समावेश आहे. विंचूर्णी येथे 12 रुग्ण व  रावडी, सासवड , मिरढे येथील प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आलेला आहे. असे एकूण 23 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. फलटण गोळीबार मैदान येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट संपर्कातील 5 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.   कोरोना बाधितांचा जनसंपर्क मोठा असल्याने नागरिकांच्यात चिंतेचे वातावरण आहे.

        आज कोविड 19 च्या चाचण्यांचे एकूण 23 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये  मौजे विंचुर्णी येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील १३, २० व २१ वर्षांची मुले, ४०, ४०, ४५ व ७० वर्षांच्या महिला आणि १०, १७, १९, १९, व २२ वर्षांच्या मुली असे एकूण १२ व्यक्तींच्या कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

        फलटण गोळीबार मैदान येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ३८, ४३, ४६, ५५ व ५८ वर्षीय पुरुष  असे एकूण ५ जणांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर सोमवार पेठ, फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ६० वर्षीय पुरुष यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच मलठण येथील २७ वर्षीय महिलेची व ७० वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

         मौजे मिरढे येथील ४५ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.  मौजे सासवड येथील २५ वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मौजे रावडी खु येथील ३४ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
  दि 17 जुलै 2020 रोजी घेतलेल्या ७३ चाचण्यांपैकी 72 अहवाल प्राप्त झाले असुन 1 अहवाल प्रलंबित असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले आहे.

No comments