Breaking News

शाळेने फी भरण्यासाठी पाठवलेल्या लिंकचा उपयोग करून झाली फसवणूक ; मोबाईलचा ॲक्सेस मिळवून सुमारे 14 लाख रुपयांचा गंडा

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  पेटीएम ॲपचे केवायसी व्हेरिफिकेशन करून देतो असे भासवून  तिघा भामट्यांनी कोळकी येथील एकास सुमारे 14 लाख रुपयाचा गंडा घातला.  पेटीएम द्वारे पैसे भरण्यासाठी शाळेने  लिंक पाठवली असता, त्यामधून लिंक ओपन झाल्यानंतर, पेटीएम डाऊनलोड केले. नंतर पेटीएमद्वारे एक मेसेज आला व त्यामध्ये मोबाईल नंबर होता. त्या नंबरवर फोन केल्यानंतर त्याने  1 रुपयाचे  ट्रांजेक्शन  करण्यास सांगितले व क्विक सपोर्ट ॲप द्वारे मोबाईलचा  ॲक्सेस मिळवून सुमारे 38 ट्रांजेक्शन द्वारे वेगवेगळ्या बँकात असणारी 13 लाख 98 हजार 271 रुपये लंपास करून फसवणूक केली.

फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय दिनकर दडस वय 40 वर्ष धंदा नोकरी राहणार फ्लॅट नंबर 303 बी स्वप्नपूर्ती अपार्टमेंट कोळकी,फलटण यांना दिनांक 28 जून 2020 सकाळी 10.00 वाजले पासून ते दिनांक 01 जुलै 2020 रोजी  दुपारी 4.00 वा चे दरम्यान  फिर्यादी  त्यांचे राहते घरी  फ्लॅट नंबर  303 बी विंग  स्वप्नपूर्ती अपार्टमेंट  कोळकी फलटण  जिल्हा सातारा येथे  असताना,  मोबाइल वापरणारे  इसम नामे  अभिषेक शर्मा, केपी सिन्हा,  राविकुमार अशी नावे धारण केलेल्या  अज्ञात इसमांनी दडस यांना वेळोवेळी फोन करून त्यांचा विश्वास  संपादन करून,   पेएटीएम ॲप ची केवायसी  व्हेरिफिकेशन करून देतो  असे म्हणाले. व दडस यांच्या मोबाईलचा  क्विक सपोर्ट  ॲप द्वारे  ॲक्सेस मिळवून त्यांच्या  क्रेडिट कार्ड व  डेबिट कार्ड च्या माहितीचा  वापर करून, एल.आय.सी., एच. डी. एफ. सी.,  आय. सी.आय.सी. आय.  बँकेच्या  क्रेडिट कार्ड मधून  व आय. सी. आय. सी. आय. बँकेचा अकाउंट मधून  एकूण 38 ट्रांजेक्शन  द्वारे  एकूण 13,98271 /- रुपये दडस यांच्या  संमतीविना  काढून घेऊन  त्यांक केली असल्याची फिर्याद दत्तात्रय दिनकर दडस यांनी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक  प्रताप पोमन हे करीत आहेत.

फिर्यादी दत्तात्रय दडस हे मुंबई पवई  येथे एका कंपनीत इंजीनियर म्हणून काम करित आहेत . लाॅकडाउन कालावधीमध्ये ते कोळकी ता. फलटण येथे आले होते. त्यांची मुले नवी मुंबई येथे शाळेमध्ये शिकत आहेत . पेटीएम द्वारे पैसे भरण्यासाठी शाळेने  लिंक पाठवली असता, त्यामधून लिंक ओपन झाल्यानंतर  पेटीएम ॲप डाउनलोड करण्यास सांगितले, पेटीएमद्वारे एक मेसेज आला व त्यामध्ये मोबाईल नंबर होता. त्यानंबरवर फोन केल्यानंतर त्याने  1 रुपयाचे  ट्रांजेक्शन  करण्यास सांगितले.  ज्या ईसमाने फोन घेतला त्याने क्विक सपोर्ट  हे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले . व त्याद्वारे फिर्यादीच्या मोबाईलचा  ॲक्सेस घेतला. व वैयक्तीक माहिती मोबाइल मधून घेवून बॅक अकाउंट व क्रेडीट कार्डमधील एकूण १३ लाख ९८ हजार रुपये काढून घेतले असल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी माहिती दिली.


No comments