Breaking News

फलटणच्या हॉटस्पॉट रविवार पेठेत 12 रुग्ण, व इतर 3 असे एकूण 15 रुग्ण पॉझिटिव्ह


फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा शंभरीकडे जात असतानाच, आज फलटण तालुक्‍यात 15 व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी 12 व्यक्ती फलटण शहरातल्या असून 3 व्यक्ती फलटण तालुक्यातील असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.

फलटण शहरातील हॉटस्पॉट ठरलेले रविवार पेठ येथे  कोरोनाचे एकूण १२ रुग्ण सापडले आहेत.  येथील पॉझिटिव्ह व्यक्तींच्या निकट संपर्कातील ९ पुरुष/मुले  वयवर्षे अनुक्रमे ७, १२, २०, १६, ३८, ६८, ४३, ४०, ३२ वर्षे व ३ महिला/मुली वयवर्षे अनुक्रमे १४, १४, २५ वर्षे कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.
खंडाळा तालुक्यातील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील मलटण ता. फलटण येथील ३९ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे.  

 मलवडी येथे राहणाऱ्या  २९ वर्षीय पुरुषाचा कोविड अहवाल  पॉझिटिव्ह आला आहे. अलगुडेवाडी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकट संपर्कातील १४ वर्षीय मुलगी कोविड पॉझिटिव्ह आली आहे. असे एकूण मिळून ता फलटण तालुक्यात 15  रुग्ण सापडले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. 

No comments