Breaking News

शासकीय नोकरी लावतो म्हणून 1 कोटी 25 लाख रुपयांची फसवणूक


            फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महाराष्ट्र शासनाकडे प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) म्हणून  कामास लावतो असे सांगून, बनावट पत्रे खरी असल्याचे भासवुन, त्याबदल्यात 1 कोटी 25 लाख रूपये घेऊन, एका भामट्याने झिरपवाडी, फलटण येथील वडील व मुलगी यांची फसवणूक केली आहे.

            फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद हरिचंद्र रणवरे रा. मलठण, फलटण याने  फिर्यादी योगिता शिवाजी गुंजवटे यांना महाराष्ट्र शासनाकडे प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) म्हणून कामास लावतो असे सांगून, त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी योगिता व तिचे वडील यांच्याकडून दि. 28  फेब्रुवारी 2009 ते 16 जुलै 2020 पर्यंत वेळोवेळी  1 कोटी 25 लाख रुपये घेतले. तसेच  नोकरी लागली असल्याबाबतची खोटी पत्रे पाठवून, ती पत्रे खरी असल्याचे भासवले, व फसवणूक केली असल्याची तक्रार योगिता गुंजवटे यांनी पोलीस स्टेशन कडे असून,पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीस अटक केली आहे.

गुन्ह्याचाअधिक तपास API राऊळ  हे करीत आहेत.

No comments