खेळांच्या मैदानांचा विकास करून सोयी-सुविधांकरिता समिती स्थापन करणार - क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनिल केदार
मंत्रालयात आज राज्यातील मैदांनाचा आढावा घेण्याकरिता आयोजित बैठकीत श्री.केदार बोलत होते. यावेळी नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उद्योग खानिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांची उपस्थिती होती.
श्री.केदार यांनी राज्यातील मैदाने जिल्हाधिकारी यांच्याकडे असतील,किंवा शासनाच्या इतर विभागाचे काही समस्या असतील तर तत्काळ सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश दिले. राज्यमंत्री कु.आदिती तटकरे आणि प्राजक्त तनपुरे यांनी विविध मैदानासंबंधी सूचना मांडल्या यावेळी शिंपोली, कांदिवली, धारावी, अंधेरी, मुलुंड, बोरीवली, मरोळ, ठाणे आणि ओव्हल मैदान यासह राज्यातील विविध मैदांनाविषयी चर्चा करण्यात आली.
No comments