गोपीचंद पडळकरांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल - जितेंद्र आव्हाड
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे,' अशी टीका भाजपचे विधापरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल.' 'शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखे आहे. फक्त प्रसिद्धीसाठी केलेला हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, तो आज त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवू नयेत. असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात आले आणि गेले. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करु शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा त्यांनी वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो.
No comments