स्वराज संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवावेत : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
अनिकेत कदम यांना शुभेच्छा देताना खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सुशांत निंबाळकर,
अभजीत नाईक निंबाळकर व इतर
अनिकेत दुर्वास कदम यांची स्वराज संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड
फलटण : जनतेचे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी राज्यस्तरावर स्वराज संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते काम करीत आहेत, या माध्यमातून आपण सर्व मिळून अधिकाधिक प्रश्न सोडवू असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांना केले. यावेळी खासदार गटाचे समर्थक व सामाजिक कार्यकर्ते श्री अनिकेत दुर्वास कदम यांची स्वराज संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली अनिकेत कदम यांनी संघटनेचे फलटण शहर प्रमुख म्हणून काम पाहिले होते.
स्वराज संघटनेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यत पोहचत त्यांचे प्रश्न जाणून घेऊ ते सोडवण्याचा प्रयत्न करू व दिलेली जबाबदारी सार्थकी लावू असे अनिकेत कदम यांनी सांगितले. यावेळी जयकुमार शिंदे, सुशांत निंबाळकर, नगरसेवक सचिन अहिवळे, डॉ प्रविण आगवणे, अभिजित नाईक निंबाळकर, मनोज कांबळे, स्वागत काशिद, जाकिरभाई मनेर, अमोल सस्ते, .माऊली सावंत, विशाल नलवडे, अक्षय काटकर, सागर धुमाळ, रवीराज पोळ, सुरज नलावडे, योगेश जाधव, शशीकांत कदम, श्रीकांत निंबाळकर तसेच भाजपा व भाजपा युवा मोर्चा चे सर्व पदअधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
No comments