राष्ट्रवादी कोंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या समवेत श्रीमंत संजीवराजे (संग्रहीत छायाचित्र)
फलटण-(प्रतिनिधी)- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हा बालेकिल्ला आज हि अभेद्य राखण्यात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करीत असताना सातारा जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम पोहचवून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नव्हे तर सर्वच जिल्हा परिषद सदस्यांच्या कामाला प्राधान्य देवून तसेच सर्व जि.प. सदस्यांना विश्वासात घेऊन सर्व सदस्यांच्या कामाला नेहमीच प्राधान्य दिले, त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची टर्म संपल्यानंतर देखील दुसरी टर्मला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना मिळावे अशी जिल्हा परिषद सदस्यांनी पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली होती. श्रीमंत संजीवराजे हे सर्वसमावेशक, मनमिळाऊ सर्वांना बरोबर घेऊन जाणारे शांत, संयमी, अभ्यासू व कधीच कोणाला न दुखावणारे नेते म्हणून संपूर्ण जिल्ह्याला माहित आहेत. आजपर्यंत श्रीमंत संजीवराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रयत्न केले आहेत. म्हणून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी श्रीमंत संजीवराजे यांच्या कार्याची दखल घेऊन संजीवराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी प्राप्त करून देण्यात यावी अशी मागणी फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे. |
No comments