फलटण शहरात 6 तर जिंती व आलगुडेवाडीत प्रत्येकी 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
फलटण (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) - दिनांक 28 जून रोजी शहर व तालुक्यात मिळून कोरोनाचे 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून,फलटण शहरात रविवार पेठ येथे 6 जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत तर जिंती ता. फलटण येथे सारी पेशंटच्या संपर्कातील एक व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. अलगुडेवाडी तालुका फलटण येथील सारी पेशंट चा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती विभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
सोलापूर महानगरपालिका परिसरातून फलटण रविवार पेठ येथे आलेल्या ७० वर्षीय महिलेची कोविड चाचणी मृत्यूनंतर आली होती. सदर व्यक्तीच्या मृत्यूपुर्व निकट संपर्कातील ३ वर्षीय मुलाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली त्या पॉझिटिव्ह आलेल्या 3 वर्षीय मुलाच्या निकट संपर्कातील ६ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये २६ वर्षीय, २७ वर्षीय महिला, 4 वर्षीय, 6 वर्षीय, 9 वर्षीय मुली आणि 7 वर्षीय मुलाचा समावेश आहे.
फडतरवाडी ता. फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या सारी पेशंटच्या निकट संपर्कातील जिंती येथील एक 44 वर्षीय महिला कोविड पॉझिटिव्ह आली आहे. मौजे अलगुडेवाडी येथील ६५ वर्षीय सारी पेशंट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती विभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
No comments