Breaking News

2 नागरिकांना आज डिस्चार्ज तर 103 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


सातारा दि. 28 -: विविध रुग्णालय व कोरोना केंअर सेंटरमध्ये  उपचार घेऊन कोरोनातून बऱ्या झालेल्या 2 नागरिकांना आज 10 दिवसानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये फलटण तालुक्यातील बरड 26 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.  

103 नागरिकांच्या घशातील नमुने तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 31, कोरोना केअर सेंटर शिरवळ  येथील 15, रायगाव येथील 16, पानमळेवाडी येथील 16, मायणी येथील 11 महाबळेश्वर येथे 14 एकूण 103 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

No comments