फलटण तालुक्यात 5 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
फलटण ( दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा ) - फलटण तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आज पाच व्यक्तींच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये कोरेगाव तालुका फलटण, कुरवली, गुणवरे, जाधववाडी व आंदरुड प्रत्येकी एक कोरोना बाधित सापडला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिले आहे.
कोरेगाव ता. फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील मौजे कोरेगाव ता. फलटण मधील १ मुलगा (५ वर्ष) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
पुणे येथे पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा १ मुलगा (४ वर्ष) रा कुरवली (गिरवी) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
वारुगड ता. माण येथे पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील गुणवरे येथील ५१ वर्षीय पुरुष कोरोना पाॅसिटीव्ह आला आहे.
मौजे जाधववाडी येथील ४३वर्षीय व आंदरुड येथील ३५ वर्षीय सारी पेशंट पॉझिटिव्ह आले आहेत. असे एकूण ५ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.
No comments