रविवार पेठ फलटण येथे 3 वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह, इतर चाचण्या आल्या निगेटिव्ह
फलटण (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) - सोलापूर महानगरपालिका परिसरातून फलटण रविवार पेठ येथे आलेल्या ७० वर्षीय महिलेची कोविड चाचणी मृत्यूनंतर दि 14 जून 2020 रोजी पॉझिटिव्ह आली होती. सदर व्यक्तीच्या मृत्यूपुर्व निकट संपर्कातील ३ वर्षीय मुलाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. इतर निकट सहवासातील व्यक्तींच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत.
दरम्यान सकाळी मंगळवार पेठ, फलटण येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या या निगेटिव्ह आल्या होत्या तर आज रात्री उशिरा रविवार पेठेतील 18 व्यक्तींच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
No comments