Breaking News

शेरेचीवाडी हिंगणगाव येथे 3 कोरोना पॉझिटिव्ह, मंगळवार पेठ फलटण येथील कोरोना चाचण्या निगेटिव्ह



        फलटण (प्रतिनिधी) - शेरेचीवाडी, हिंगणगाव  येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील तीन  व्यक्तींच्या चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या असून, मंगळवार पेठ येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या या निगेटिव्ह आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.

        मुंबई परिसरातून शेरेचीवाडी (हिंगणगाव) येथे दि १२ जून २०२० रोजी आलेल्या ३८ वर्षीय महिलेची कोविड चाचणी दि १३ जून २०२० रोजी पॉझिटिव्ह आली होती. सदर महिलेच्या निकट संपर्कातील ३ व्यक्तींच्या कोविड चाचण्या  पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामध्ये दोन पुरुष(६१ वर्षे, ३२ वर्षे) व एक महिला (२७ वर्षे) चा समावेश आहे. सदरच्या तिन्ही व्यक्ती मुंबई परिसरातून आलेल्या आहेत.

        दिनांक 14 जून रोजी फलटण येथील मंगळवार पेठ येथील 62 वर्षीय पुरुष रुग्ण कोविड 19 पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने घेऊन ते पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी मंगळवार पेठ येथील निकट संपर्कवासीत यांचे अहवाल निगेटीव्ह  आले आहेत. तर रविवार पेठ फलटण येथील रिपोर्ट प्रलंबित आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.

No comments